महावार्ता स्पोर्ट्स न्यूज: पुण्यातील जिम्नॉस्टिक्स अ‍ॅकॅडमी पाहून क्रीडामंत्री महाजनही झाले खेळाडू

/ / News

महावार्ता न्यूज ः क्रीडामंत्री गिरिष महाजन यांनी पुण्यातील कर्वेनगरमधील अजित जरांडे यांच्या इन्फीनिटी जिम्नॉटिक्स अ‍ॅकॅडमीला सदिच्छा भेट दिली. भेटमध्ये जिम्नॅस्टिक्स सुविधा पाहून भारावून गेलेल्या क्रीडामंत्री महाजन यांनीही ट्रम्पपोलीनवर उड्या मारून खेळाचा आनंद लुटला.
पुणे दौर्‍यात इन्फीनिटी जिम्नॉटिक्स अ‍ॅकॅडमीच्या पालकांनी विनंती केल्यामुळे क्रीडामंत्री गिरीष महाजन यांनी इन्फीनिटी जिम्नॉटिक्स अ‍ॅकॅडमीला अचानक भेट दिली. क्रीडामंत्री महाजन यांनी इन्फीनिटी जिम्नॉटिक्स हॉलमधील सर्व साधनांची महिती घेतली. मुलांचे प्रदर्शनीय प्रात्यक्षिक पाहून मंत्री महोदयांनी त्यांचे कौतुक केले. मुलांची प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर उत्साहाने ऑलिम्पिक दर्जाच्या ट्रम्पपोलीनवर उड्या मारण्याचा आनंद लुटला.